जॉनी लिव्हरच्या फॅन्ससाठी खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 09:46 IST
जॉनी लिव्हरने आज एक कॉमेडीयन म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये जॉनीने खूप चांगल्या ...
जॉनी लिव्हरच्या फॅन्ससाठी खुशखबर
जॉनी लिव्हरने आज एक कॉमेडीयन म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये जॉनीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोलमाल अगेन या चित्रपटातील जॉनीच्या भूमिकेची चांगलीच चर्चा होत आहे. जॉनी लिव्हर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पण आता तो प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. खूप वर्षांपूर्वी जॉनी आला रे हा कार्यक्रम प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळाला होता. त्यानंतर जॉनीने कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारली होती. आता अनेक वर्षांनंतर जॉनी छोट्या पडद्यावर परतत आहे. सब टिव्ही वाहिनीवर प्रेक्षकांना लवकरच पार्टनर्स हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण या कार्यक्रमाद्वारे जॉनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. जॉनी या कार्यक्रमात प्रेक्षकांना डबल रोल मध्ये पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा विषय हा पोलिसांशी संबंधित असून पोलिस केस कशाप्रकारे सोडवतात आणि त्यामध्ये काय काय धमाल होते हे प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.जॉनी शिवाय या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरचे आणि मोठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांद्वारे आपल्याला खळखळून हसवणारे असरानी या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. तसेच किकू शारदा, विपुल रॉय, किशोर मर्चंट, श्वेता गुलाटी आणि अश्विनी कळसेकर प्रेक्षकांना या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पार्टनर्स या कार्यक्रमाचे पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये किकू आणि जॉनी दोघेही आपल्याला पोलिसांच्या वर्दीत पाहायला मिळत आहेत. किकू अनेक वर्षं कपिल शर्मासोबत काम करत होता. पण आता द कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्या नंतर किकू एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात किकू पोलिसाच्या भूमिकेत आहे. त्याने एफआईआर या मालिकेत अनेक वर्षं पोलिसाची भूमिका साकारली होती. Also Read : जॉनी लिव्हरला घरच्या परिस्थितीमुळे केवळ येवढेच शिक्षण घेता आले...