सध्या सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. २०२१ मध्ये अनेक मराठी कलाकारांचे लग्न आणि साखरपुडा पार पडल्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने गुड न्यूज दिली आहे. फुलपाखरू फेम अभिनेता यशोमन आपटे (Yashoman Apte)ने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. पण थांबा तुम्ही विचार करत असाल की यशोमनचा साखरपुडा पार पडला आहे तर तसं अजिबात नाही आहे. यशोमनचा साखरपुडा झालेला नसून त्याचा भाऊ अभिमान आपटेचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे आहे. अभिमानचा साखरपुडा ऋतुजा जोशी हिच्यासोबत झाला आहे.
भावाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत यशोमनने 'Sorry lovely ladies but he's engaged now' असे लिहिले आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
यशोमन हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याचे अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच स्वतःचे अनेक फोटो शेअर करत अनेक ट्रेडिंग रिल बनवत चाहत्यांच्या संपर्कात असतो.