Join us

​​सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 13:03 IST

​​सुनील ग्रोव्हर आणि सुदेश लहरी लवकरच एकत्र येणार असल्याचे सुदेशने एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

सुनील ग्रोव्हरचे फॅन फॉलॉव्हिंग खूप आहे. द कपिल शर्मा शो आणि कॉमेडी नाइटस विथ कपिल या कार्यक्रमाद्वारे त्याने लोकांना खळखळून हसवले आहे. आता त्याच्या फॅन्ससाठी खूपच चांगली बातमी आहे. तो छोट्या पडद्यावर परतणार असल्याचे म्हटले जात आहे.  सुदेश लहरी आणि सुनील ग्रोव्हर यांची अनेक वर्षांपासून खूप चांगली मैत्री आहे. सुदेश सध्या द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात काम करत आहे. त्याला भेटण्यासाठी नुकताच सुनील द ड्रामा कंपनीच्या सेटवर गेला आहे. त्या दोघांनी सेटवर खूप साऱ्या गप्पा मारल्या. सुनील द ड्रामा कंपनीच्या सेटवर आल्यामुळे आता सुनील या कार्यक्रमाचा भाग होणार का असा सगळ्यांना प्रश्न पडला होता आणि त्यात सुदेशने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून ते दोघे लवकरच एकत्र येणार असल्याचे सांगितले आहे.Also Read : सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाखया व्हिडिओची सुरुवात पाहिल्यानंतर सुनील द ड्रामा कंपनीचा भाग होतोय का असा प्रश्न त्याच्या फॅन्सना नक्कीच पडला होता. पण या व्हिडिओच्या शेवटी खऱी गंमत आहे. ते दोघे एकत्र येणार म्हणजे काय याचा अर्थ सुदेशने व्हिडिओच्या शेवटी सांगत लोकांचा पोपट केला आहे. तो या व्हिडिओत म्हणतो, आम्ही एकत्र येणार म्हणजे लोकांना वाटत असणार आता मी आणि सुनील एकत्र काम करणार. हो हे खरे आहे, आम्ही दोघे मिळून एक काम  करणार आहोत, ते म्हणजे आम्ही पोस्टर बॉईज एकत्र पाहाणार आहोत. सुदेशचे हे बोलणे सुरू असताना सुनील मध्येच बोलतो, तुम्हाला आम्हाला एकत्र पाहायचे असेल तर तुम्ही देखील चित्रपटगृहात या...सुदेशने हा व्हिडिओ पोस्ट करताना तो परत येतोय असा हॅशटॅग दिला असल्याने सुनीलच्या फॅन्सना तो परतत असल्याचेच वाटत होते. पण हा व्हिडिओ पाहून नक्कीच त्यांची निराशा झाली आहे. पण त्याच्या फॅन्सना सुदेश आणि सुनीलचा हा सेन्स ऑफ ह्युमर खूपच आवडला आहे.सुनील द कपिल शर्मा शोमध्ये डॉ. मन्सुर गुलाटी ही व्यक्तिरेखा खूपच चांगल्याप्रकारे साकारत होता. पण कपिल आणि त्याची भाडणं झाल्यावर त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्याने त्यानंतर अनेक कार्यक्रमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या. पण आता तो छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत परतणार कधी याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.