Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज... बिग बॉस स्पर्धक करण मेहराची पत्नी निशा रावळ गरोदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 14:25 IST

करण मेहराची पत्नी निशा रावळ ही गरोदर असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. पण या बातम्यांकडे दुर्लक्ष करणेच ...

करण मेहराची पत्नी निशा रावळ ही गरोदर असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. पण या बातम्यांकडे दुर्लक्ष करणेच करण आणि निशाने पसंत केले होते. पण निशा गरोदर असल्याचे आता स्वतः तिने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवरून सांगितले आहे.  ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिक या भूमिकेमुळे करण मेहराला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण तब्येतीच्या कारणामुळे त्याने काहीच महिन्यांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला. या मालिकेनंतर तो कोणत्या कार्यक्रमात झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेनंतर काहीच महिन्यात तो बिग बॉस या कार्यक्रमात झळकला. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे करण बिग बॉसचा एक प्रबळ दावेदार मानला जात होता. पण त्याला काहीच आठवड्यात बिग बॉसचे घर सोडावे लागले. निशा आणि करण हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध कपल आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण त्यांच्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. निशाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे ही गुड न्यूज सगळ्यांना दिली आहे. निशाने पोटाला हात लावलेला एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, माझे वजन वाढल्यामुळे कित्येक दिवसांपासून मी गरोदर असल्याचा सगळ्यांनाच संशय येत आहे. हो, हे खरे आहे. लवकरच आमचे पहिले बाळ या जगात येणार आहे. आम्हाला सगळ्यांना तुमच्या शुभेच्छांची खूप गरज आहे.