Join us
Daily Top 2Weekly Top 5

Good News! अभिनेत्री किश्वर मर्चेंटने दिला गोंडस बाळाला जन्म, बाळासोबतचा पहिला फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 11:03 IST

अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि सुयश रायने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि सुयश रायने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शुक्रवारी किश्वरने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृत्ती उत्तम आहे. किश्वर आणि सुयशने मुलासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची वार्ता चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे.

सुयश रायने वडील झाल्याच्या आनंदात परफेक्ट फॅमिलीचा परफेक्ट फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. आईच्या मिठीत छोटा पाहुणा पहायला मिळतो आहे. किश्वर मर्चेंट आणि सुयश राय या दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्याला खूप पसंती मिळते आहे.

या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, २७.०८.२१… बेबी रायचे स्वागत आहे. मुलगा झाला आहे. यासोबतच हॅशटॅगमध्ये तिने सुकिशचा बेबी असे लिहिले आहे. किश्वरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत तिच्या मित्र मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

किश्वर मर्चेंट आणि सुयश राय २०१० सालापासून रिलेशनशिपमध्ये होते. २०१५ साली त्यांनी बिग बॉसच्या नवव्या पर्वात सहभाग घेतला होता. २०१६ मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले. यावर्षी मार्च महिन्यात किश्वरने प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :बिग बॉस