Join us

'गेला उडत' चा सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 17:20 IST

सेल्फीची क्रेझ प्रत्येकालाच असते. कोणत्याही ठिकाणी पोहोचल्यावर सेल्फी काढल्याशिवाय जमत नाही. तसेच सेल्फीवर सेल्फी झाले की शेवटी प्रत्येकजण म्हणतो ...

सेल्फीची क्रेझ प्रत्येकालाच असते. कोणत्याही ठिकाणी पोहोचल्यावर सेल्फी काढल्याशिवाय जमत नाही. तसेच सेल्फीवर सेल्फी झाले की शेवटी प्रत्येकजण म्हणतो बस ना यार.... सेल्फी गेला उडत.पण आपला मराठी इंडस्ट्रीचा सुपर हिरो सिध्दार्थ जाधव याने मात्र नाटकच्या सरावादरम्यान  सेल्फी 'गेला उडत' न करता एक झक्कास सेल्फी 'गेला उडत' टीम सोबत काढला आहे. केदार शिंदे या नाटकचे दिग्दर्शक असून सिध्दार्थ जाधव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सिध्दार्थचा सेटवरचा हा उत्साह पाहता रंगभूमीवर मोठया कालावधीनंतर पुन्हा येण्यास उत्साही दिसत आहे. तसेच हे नाटक विनोदशील असल्याचे त्याच्या पोस्टरवरूनच कळते. फटा पोस्टर निकला सुपर हिरो अशी या नाटकाची टॅगलाइनदेखील चर्चेत आहे. हे नाटक ७ मे ला प्रदर्शित होणार आहे.