जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या मालिकेची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 14:27 IST
कलर्स मराठी वाहिनीवर आवाज या मालिकेतेतील मिनीसीरीज सध्या जोर धरू लागली आहे. या मिनीसीरीजमध्ये ज्ञानेश्वर महाराजनंतर समाजासुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य दाखविण्यात येणार आहे. या मालिकेत समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या भूमिकेत प्रसाद ओक झळकणार असल्यामुळे या मालिकेची एक झलक पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्साही होते.
जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या मालिकेची झलक
Exculsive - बेनझीर जमादार कलर्स मराठी वाहिनीवर आवाज या मालिकेतेतील मिनीसीरीज सध्या जोर धरू लागली आहे. या मिनीसीरीजमध्ये ज्ञानेश्वर महाराजनंतर समाजासुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य दाखविण्यात येणार आहे. या मालिकेत समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या भूमिकेत प्रसाद ओक झळकणार असल्यामुळे या मालिकेची एक झलक पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्साही होते. त्यामुळे त्यांचा हा उत्साह पाहता प्रेक्षकांची ही इच्छा या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकरने यांनी पूर्ण केली आली आहे. त्यांनी नुकताच आवाज या मालिकेतेतील जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले याची मिनीसीरीज असणारा व्हिडीओ सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. यामध्ये सावित्रीबाईच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा जोशी दिसत आहे. तसेच ही मालिका सचिन गोखले यांनी दिग्दर्शित केली आहे. १ आॅगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.