Join us
Daily Top 2Weekly Top 5

गीता कपूर आणि फैजल खानच्या डान्स परफॉर्मन्सने भारावली रसिकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:45 IST

प्रेक्षकांच्या मनात आपल्या नृत्याने आपले स्थान भक्कम करण्यात सध्या जोड्या व्यस्त असताना, हाय फिव्हरमध्ये उत्कृष्ट ‘आई-मुलगा’ जोडीने सगळ्यांचेच लक्ष ...

प्रेक्षकांच्या मनात आपल्या नृत्याने आपले स्थान भक्कम करण्यात सध्या जोड्या व्यस्त असताना, हाय फिव्हरमध्ये उत्कृष्ट ‘आई-मुलगा’ जोडीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ‘थॅंक यू’ या विशेष भागात नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि अभिनेता डान्सर फैजल खान यांना आमंत्रित करण्यात आले होते.आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ‘गीता मॉं’ या नावाने ओळखली जाणाऱ्या गीताचे आपला विद्यार्थी फैजल खानबरोबर विशेष बंध आहेत. वयाच्या १३ व्या वर्षापासून ‘गीता माँ’ ला आईप्रमाणे मानत असल्यामुळे सरप्राईज देण्यासाठी फैजल आला होता.इतके वर्ष दिलेल्या पाठिंबा आणि मार्गदर्शनासाठी आभार मानण्यासाठी तो आला होता.त्या दोघांनाही बांधून ठेवणारी भाषा अर्थातच नृत्य,यावेळी गीता कपूरसाठी अतिशय ह्रदयस्पर्शी नृत्य फैजलने केले.भावूक झालेल्या ‘गीता माँ’ ने आपल्या भारलेल्या हास्यासह फैजलला मिठी मारली आणि सांगितले, “आज अतिशय विशेष दिवस असल्यामुळे मी खूप साऱ्या आठवणी इथून घेऊन जात आहे. मी खरंच खूप भारावून गेले आहे, इतके प्रेम मला मिळते आहे, पण त्यासाठी मी नक्की काय केले आहे मला खरंच माहीत नाही, पण मी देवाची खूप आभारी आहे.माझा मुलगा, माझा बेबी, फैजल माझे तुझ्यावर खूपच प्रेम आहे. कितीतरी मुलं मला नेहमी विचारतात की,आम्ही फैजलसारखा परफॉर्मन्स दिला का आणि मी विनाफिकीर सरळ नाही सांगते.तो १३ वर्षांचा असल्यापासून मी त्याला ओळखते आहे आणि तो नेहमीच माझ्यासाठी १३ वर्षांचा माझा मुलगा राहील. हाय फिव्हर आणि या अविस्मरणीय क्षणांसाठी परत एकदा मनापासून आभार.तुम्हाला कोणाचेही कधीही आभार मानायचे असतील तर ते त्या क्षणी माना अन्यथा तुम्ही तो मौल्यवान वेळ तुमच्या आयुष्यातून कायमचा  गमावता.”फैजलदेखील यावेळी फारच भावूक झाला होता आणि त्याने यावेळी अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपले मन मोकळे केले,“माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेल्या व्यक्तीचे – गीता मा चे मला आज आभार मानायचे आहेत. आज मी माझ्या दोन्ही आईंमुळे इथे उभा आहे,एक जिने मला जन्म दिला आणि एक तू, जिने मला नेहमीच योग्य दिशा दाखविली.गीता माँ ने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकविले. शिवाय मी तिच्याकडून अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे – ‘स्वप्नं ही वय पाहून नाही, तर कर्म करून पाहिली पाहिजेत’ जे कायम माझ्याबरोबर राहील, तुमचे खूप खूप आभार.”