Join us

​गुलाम फेम विकास मनकतला आणि त्याची पत्नी गुंजन वालिया झळकणार नच बलियेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 11:01 IST

नच बलिये 8 सिझन लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक झळकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ...

नच बलिये 8 सिझन लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक झळकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. गुलाम या मालिकेतील खलनायक विकास मनकतला नच बलियेमध्ये त्याची पत्नी गुंजन वालियासोबत झळकणार असल्याचे विकासनेच सांगितले आहे. विकास हा गुलाम या मालिकेत पत्नीला त्रास देणारा दृष्ट दाखवला असला तरी खऱ्या आयुष्यात तो खूप प्रेमळ आहे. गुंजन आणि विकासची केमिस्ट्री प्रेक्षकांना या डान्स रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. याविषयी विकास सांगतो, "खरे तर सध्या मी गुलाम या माझ्या मालिकेमध्ये व्यग्र आहे. दिवसातील 10 ते 12 तास मला या मालिकेच्या चित्रीकरणाला द्यावे लागतात. पण नच बलियेमुळे मला माझ्या पत्नीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मी एन्जॉय करेन याची मला खात्री आहे. या मालिकेचे चित्रीकरण कधी सुरू होईल याची मला उत्सुकता लागली आहे. दोन्ही कार्यक्रमांना वेळ देणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे होणार आहे. पण मी दोन्ही कार्यक्रमांना 100 टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे." विकास आणि गुंजन यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले आहे. त्या दोघांची ओळख एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत झाली होती. पण त्यावेळी त्या दोघांमध्ये केवळ हाय-बाय इतकेच बोलणे झाले होते. एकदा विकास अंधेरीतील लोखंडवाला मार्केटमध्ये फिरत असताना त्याला गुंजन भेटली आणि त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर ते एकमेकांशी बोलायला लागले आणि एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनले. त्यांच्या दोघांमध्ये अफेअर होऊ शकते असा त्यांनी  सुरुवातीच्या काळात विचारदेखील केला नव्हता. पण काही वर्षांनंतर गुंजनमधील अनेक गोष्टी विवेकला आवडू लागल्या आणि तो तिच्या प्रेमात पडला. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्या दोघांनी 2015 मध्ये लग्न केले. गुंजनदेखील अभिनेत्री असून तिने घर की लक्ष्मी बेटियाँ, कुछ अपने कुछ पराये, सिंदूर तेरे नाम का यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.