Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताचं शुभमंगल सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 10:12 IST

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या घाडगे & सून मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेत सुकन्या कुलकर्णी मोने साकारत ...

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या घाडगे & सून मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेत सुकन्या कुलकर्णी मोने साकारत असलेली माईंची भूमिका, चिन्मय उद्गिरकरची अक्षयची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मालिका सुरू झाल्यापासून अक्षय आणि अमृताचे लग्न होणार की नाही याविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागली होती. अक्षय आणि अमृताने त्यांच्या मनाविरुद्ध होणारे हे लग्न होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले, पण आता अखेर हे दोघे लग्न मंडपापर्यंत येऊन पोहचले आहेत. माईंच्या सांगण्यावरून अक्षय हे लग्न करण्यास तयार झाला आहे. पण या दोघांनाही मनापासून एकमेकांशी लग्न करायचं नाहीये. कारण दोघांचीही स्वप्नं, ध्येयं पूर्णपणे वेगळी आहेत. अक्षय–अमृताच्या मनाविरुद्ध जुळलेले हे नाते माईंच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल? हे दोघेही संसाराचा भार पेलू शकतील? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना काहीच दिवसांत या मालिकेत मिळणार आहेत. या लग्नामध्ये आलेल्या असंख्य अडचणीवर मात करून माईंनी अक्षयला लग्नासाठी तयार केले आहे. पण लग्नानंतर या दोघांना माई लग्न या पवित्र बंधनाचे महत्त्व पटवून देतील की नाही हे पाहाणे रंजक असणार आहे.घराला एकत्र बांधून ठेवेल, आपल्या जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पेलेल. घरातल्या लोकांना समजून घेईल अशी सून घाडगे परिवारासाठी माईंना हवी आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना अमृतामध्ये दिसल्या आणि त्याचमुळे त्यांनी परिवाराच्या सहमतीने अमृता आणि अक्षयचे लग्न करून दिले. परंतु अमृतासाठी करिअर अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनापासून ती अक्षयशी लग्न करायला तयार नाहीये तर दुसरीकडे अक्षयचे कियारावर प्रेम आहे. त्यामुळे तो देखील माईंच्या या निर्णयाने हादरला आहे. अनेक अडचणी पार करत माईंनी अक्षय आणि अमृताचे लग्न लावून दिले आहे. त्यामुळे आता त्यांचा पुढचा प्रवास कसा असणार? अमृता अक्षयच्या परिवारातल्या मंडळीशी कशी जुळवून घेणार? अक्षय आणि अमृता एकमेकांना स्वीकारणार का याची उत्तरे पुढचा काळच देणार आहे. Also Read : छोटा पडदा खूप बदलला आहेः सुकन्या कुलकर्णी