Join us
Daily Top 2Weekly Top 5

​घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताच्या नात्याची होणार नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:35 IST

घाडगे & सून ही मालिका सुरू झाल्यापासून अक्षय आणि अमृताचे लग्न होणार की नाही याविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागली ...

घाडगे & सून ही मालिका सुरू झाल्यापासून अक्षय आणि अमृताचे लग्न होणार की नाही याविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागली होती. अक्षय आणि अमृताने त्यांच्या मनाविरुद्ध होणारे हे लग्न होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले, पण अखेर त्या दोघांचे लग्न झाले. माईंच्या सांगण्यावरून अक्षय हे लग्न करण्यास तयार झाला. पण या दोघांनाही मनापासून एकमेकांशी लग्न केलेले नाहीये. या दोघांचीही स्वप्नं, ध्येयं पूर्णपणे वेगळी आहेत. अक्षय आणि अमृताने मनाच्या विरोधात लग्न केले आहे. त्यामुळे लग्नाच्या महिन्याभरातच वेगळे व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. पण आता त्यांच्यात मैत्रीच्या नात्याची सुरुवात होणार असल्याचे कळतेय. त्यांच्या नात्याला आता एक वेगळे वळण मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. घराला एकत्र बांधून ठेवेल, आपल्या जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पेलेल. घरातल्या लोकांना समजून घेईल अशी सून घाडगे परिवारासाठी माईंना हवी होती. या सगळ्या गोष्टी त्यांना अमृतामध्ये दिसल्या आणि त्याचमुळे त्यांनी परिवाराच्या सहमतीने अमृता आणि अक्षयचे लग्न करून दिले. परंतु अमृतासाठी करिअर अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनापासून ती अक्षयशी लग्न करायला तयार नव्हती तर दुसरीकडे अक्षयचे कियारावर प्रेम होते. त्यामुळे तो देखील माईंच्या या निर्णयाने हादरला होता. पण अनेक अडचणी पार करत माईंनी अक्षय आणि अमृताचे लग्न लावून दिले. त्या दोघांचे पटणारच नाही असे सगळ्यांनाच वाटत होते. पण आता ते दोघे मित्रमैत्रीण म्हणून तरी एकमेकांशी चांगल्या प्रकारे बोलायला लागले आहेत. घाडगे & सून या मालिकेत सुकन्या कुलकर्णी, चिन्मय उद्गिरकर, भाग्यश्री लिमये यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आणि कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. भाग्यश्री आणि चिन्मयची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.  Also Read : ​घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री लिमयेला होते चिन्मय उद्गिरकरवर क्रश