गेट वेल सून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:25 IST
सध्या सगळीकडेच तापाची साथ पसरली आहे. छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार तापाने त्रस्त आहेत. रवी दुबे आणि सरगुण मेहता हे ...
गेट वेल सून
सध्या सगळीकडेच तापाची साथ पसरली आहे. छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार तापाने त्रस्त आहेत. रवी दुबे आणि सरगुण मेहता हे पती-पत्नीदेखील अनेक दिवसांपासून तापाने फणफणले आहेत. दोघेही तापामुळे कोणत्याही मालिकेचे सध्या चित्रीकरण करत नाहीयेत. रवी सध्या जमाई राजा या मालिकेत काम करत आहे. त्याची सहकलाकार ओरवाना घईने सरगुण आणि रवीसाठी त्यांच्या घरी नुकतीच कुकी आणि एक चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठीत तुम्ही दोघे लवकरात लवकर बरे होवो ही आमची सगळ्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. ओरवानाने पाठवलेल्या कुकीज आणि चिठ्ठीचा फोटो रवीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याने तिचे आभार मानले आहेत.