Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसमध्ये प्रवेश करण्याआधी या अभिनेत्रीला विचारण्यात आले, सेक्स न करता १०० दिवस राहशील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 16:41 IST

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सेक्स न करता १०० दिवस राहशील का? असा प्रश्न विचारण्यात आला असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री गायत्री गुप्ताने या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमाच्या समन्वयकाने सेक्स न करता १०० दिवस कशी राहाशील अशी धक्कादायक विचारणा तिला केली होती.

बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असतो. बिग बॉसमध्ये निर्माण होणाऱ्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळेच या कार्यक्रमाला खूप चांगली लोकप्रियता मिळते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. बिग बॉस हा कार्यक्रम भारतात सगळ्यात पहिल्यांदा हिंदी भाषेत सुरू झाला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काही सिझनचे सूत्रसंचालन शिल्पा शेट्टी, अर्शद वारसी आणि अमिताभ बच्चन यांनी केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. हिंदीतील बिग बॉस प्रसिद्ध झाल्यानंतर आता दाक्षिणात्य विविध भाषेत तसेच मराठीत आपल्याला हा कार्यक्रम पाहायला मिळत आहे.

तेलगु भाषेतील बिग बॉस हा कार्यक्रम तर आता चांगलाच वादात अडकला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. बिग बॉस तेलगु या कार्यक्रमात भाग घेण्याआधीच एका अभिनेत्रीला अतिशय वाईट अनुभव आला असल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेत्री गायत्री गुप्ताने या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमाच्या समन्वयकाने सेक्स न करता १०० दिवस कशी राहाशील अशी धक्कादायक विचारणा केली होती. एवढेच नव्हे तर आमच्या बॉसला इम्प्रेम करण्यासाठी तू काय करू शकतेस असे मला विचारण्यात आले होते अशी तक्रार या अभिनेत्रीने आता थेट पोलिसांकडे नोंदवली आहे. 

बिग बॉस तेलगू या कार्यक्रमात सहभागी होण्याआधी बिग बॉस आयोजकांनी मला सेक्स न करता १०० दिवस बिग बॉसच्या घरात कशी राहाशील असा प्रश्न विचारला होता असा आरोप गायत्री गुप्ता या अभिनेत्री केला असून हैदराबाद येथील बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात आयोजकांविरोात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिग बॉस तेलगूमधील हा वाद आता विकोपाला पोहोचला असून यावर पोलिस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :बिग बॉस