गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध नृत्यांगना आहे. गावोगावी तिचे कार्यक्रम हाऊसफुल असतात. गौतमी स्टेजवर येते तेव्हा लहान मुलं, महिला, पुरुष सगळेच थिरकतात. लावणी डान्स आणि सौंदर्यामुळे तिला सोशल मीडियावर "सबसे कातील गौतमी पाटील" म्हणून ओळखले जाते. तिचे डान्स व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. नुकतंच गौतमीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीने गळ्यात एक दागिना परिधान केलेला दिसतोय. या दागिन्यात एक खास नाव आहे. हे नाव नेमके कुणाचे आहे? असे तिचे चाहते विचारत आहेत.
गौतमी ही समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिने गळ्यात एक सुंदर साखळी परिधान केली आहे. मात्र, या साखळीमध्ये असलेल्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यानंतर या दागिन्यामध्ये 'कान्हा' हे नाव असल्याचं स्पष्ट होतं. 'कान्हा' म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचं एक प्रेमळ नाव. त्यामुळे गौतमीने हा दागिना भक्तीभावातून परिधान केल्याचं कळतंय.
सध्या गौतमीचं करिअर सुसाट धावते आहे. तिला अनेक मराठी सिनेमांमध्येही डान्स नंबर करण्याची संधी मिळत आहे. तसेच गौतमी काही अल्बममध्ये झळकत आहे. नुकतंच गौतमी आणि 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेचं 'मासोळी सोन्यावाणी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. याआधी गौतमीचं महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतसोबतचं 'गच्ची' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. तर त्याआधी गौतमी गायक अभिजीत सावंतसोबत 'रुपेरी वाळूत' अल्बममध्ये झळकली होती.
Web Summary : Gautami Patil, a popular dancer, is in the news again. A video showing her wearing a necklace with 'Kanha' (Lord Krishna) inscribed on it has gone viral. She has been featured in several music videos and films.
Web Summary : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटिल फिर से चर्चा में हैं। 'कान्हा' नाम का हार पहने हुए उनका एक वीडियो वायरल हो गया है। वह कई म्यूजिक वीडियो और फिल्मों में नजर आई हैं।