'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरेला काही दिवसांपूर्वी पवईमध्ये म्हाडाचं घर लॉटरीमध्ये मिळालं होतं. नुकतंच त्याच्या घराचं इंटेरियरचं काम पूर्ण झालं असून त्याने काल गृहप्रवेश केला. 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असं त्याने घराबाहेर पाटी लावली आहे. या आनंदाच्या वेळी गौरवचे नातेवाईक, इंडस्ट्रीतील मित्रमंडळी आवर्जुन आले होते. तसंच गौरवने लग्न केल्याचीही मोठी बातमी सर्वांना मिळाली आणि चाहत्यांना सुखद धक्काच बसला. या सगळ्यावर आता गौरवने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरे म्हणाला, "सकाळी पूजा झाली तेव्हा अख्खं घर आपल्या माणसांनी भरलं होतं. गावावरुन ७० लोक आले आहेत. शेवटी तुम्ही तुमचं मूळ विसरुन चालत नाही. घर इतकं भारी बनेल असं मलाही वाटलं नव्हतं. मी फिल्टरपाड्यातून आलोय हे माझ्या कायम लक्षात राहिलं पाहिजे म्हणूनच ती नेमप्लेट दिली. आज ते फिल्टरपाड्यातील मंडळीही येणार आहेत. सर्वांना बोलवलंय..जितके माझ्या परिचयाचे आहेत सगळ्यांना बोलवलंय. हे तुमचंही घर आहे असं मी त्यांना सांगितलंय."
तो पुढे म्हणाला, "मला आधीपासून इमारतीतील घरं कशी असतील याची उत्सुकता होती. महत्वाचं म्हणजे बिल्डिंगमधल्या घरात आतमध्ये टॉयलेट असतं ते माहित होतं. आपापली स्पेस असते. आज माझा ताडपत्रीच्या घरातून ते पवईत इमारतीतील घरात प्रवेश झाला आहे याचा आनंद वेगळाच आहे."कोण आहे गौरवची बायको?
गौरवच्या बायकोचं नाव आहे प्रियंका कारेकर. प्रियंकाचा सुद्धा मनोरंजन विश्वाशी संबंध असून तिने आर. बाल्की, गौरी देशपांडे यांसारख्या दिग्गज बॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. प्रियंका आणि गौरव गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रियंकाच्या प्रोफाईलवर गौरव आणि तिचे अनेक फोटो बघायला मिळतात. दोघांनीही त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा अद्याप केला नव्हता.
Web Summary : Gaurav More, of 'Maharashtrachi Hasyajatra' fame, celebrated his new MHADA home with family and friends, revealing his marriage to Priyanka Karekar. He expressed joy moving from a tarpaulin house to a building in Powai, emphasizing his roots.
Web Summary : 'महाराष्ट्रची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे ने अपने नए म्हाडा घर का जश्न परिवार और दोस्तों के साथ मनाया, और प्रियंका कारेकर से अपनी शादी का खुलासा किया। उन्होंने तिरपाल वाले घर से पवई में एक इमारत में जाने पर खुशी व्यक्त की, और अपनी जड़ों पर जोर दिया।