Join us

गौरव मोरेने तेजश्री प्रधानला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्रीने विचारलं "तुझं शिक्षण किती?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:02 IST

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत तेजश्री दिसणार आहे. या मालिकेमुळे तेजश्री चर्चेत आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने तेजश्रीला लग्नाची मागणी घातली आहे.

तेजश्री प्रधान नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत तेजश्री दिसणार आहे. तिच्यासोबत या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे. या मालिकेमुळे तेजश्री चर्चेत आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने तेजश्रीला लग्नाची मागणी घातली आहे. याचा व्हिडीओ तेजश्रीने शेअर केला आहे. 

या व्हिडीओत गौरव तेजश्रीच्या घरी कांदेपोह्याच्या कार्यक्रमासाठी आल्याचं दिसत आहे. गौरव मोरे तेजश्रीला "तुम्ही काय करता?" असं विचारतो. त्यावर उत्तर देत ती म्हणते "मी environmental science मध्ये पीएडी केलीये". तेजश्रीचं उत्तर ऐकून गौरव म्हणतो, "म्हणजे तुमची १२वी राहिलीये". ते ऐकून तेजश्री पेचात पडते. ती त्याला विचारते "तुमचं शिक्षण किती झालंय". शिक्षणाबद्दल विचारताच गौरव लगेच विषय बदलतो आणि घराबद्दल बोलू लागतो. आय एम कॉफी लव्हर असं गौरव म्हणताच तेजश्री त्याच्यासोबत इंग्रजीत बोलू लागते. त्यानंतर मग गौरवची बोबडी वळते. तेजश्रीच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या प्रमोशनसाठी हा मजेशीर व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंटही केल्या आहेत. 

'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये तेजश्री स्वानंदी ही भूमिका साकारत आहे. स्वानंदी लग्नासाठी मुलगा शोधत आहे. तर समरच्या भूमिकेत असलेला सुबोध भावेही लग्नासाठी मुलगी शोधत आहे. मालिकेत ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पण, त्यांच्या दोघांतली वीण जुळेल का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. आजपासून(११ ऑगस्ट) सोमवार-शनिवार रात्री ७.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान टिव्ही कलाकार