Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रकांता' मालिकेत संजीदा शेखनंतर गौरव खन्नाची मुख्य भूमिकेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 16:19 IST

'चंद्रकांता'च्या भूमिकेसाठी संजीदा शेखची वर्णी लागल्यानंतर आता गौरव खन्नाची राजा वीरेन्द्र या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.राजा वीरेन हा ...

'चंद्रकांता'च्या भूमिकेसाठी संजीदा शेखची वर्णी लागल्यानंतर आता गौरव खन्नाची राजा वीरेन्द्र या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.राजा वीरेन हा आपल्या आयुष्यात रोज नवनव्या आव्हानांचा शोध घेत असतो.लहानपणापासूनच त्याला नवनव्या आव्हानांचा मुकाबला करण्यास शिकवले जाते. जो कोणी आपल्या या ध्येयाच्या आड येईल, त्याचा शेवट करण्याचे शिक्षण राजा वीरेन्द्रला दिलेले असते. सर्वजण त्याला घाबरून असतात. त्याचा देवावर आणि प्रेमावर विश्वास नसतो.अशा प्रकारची राजा वीरेन्द्रही भूमिका असणार आहे.यासंदर्भात गौरवकडे विचारणा केली असता तो म्हणाला,“एक अभिनेता या नात्याने मला सर्व प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात.यापूर्वी मी सासू-सुनेच्या घरगुती मालिकांमध्ये, तसंच विनोदी मालिकांमध्येही भूमिका साकारालेल्या आहेत. आता चंद्रकांतातील भूमिका या सा-यापेक्षा अगदी वेगळी आहे.शिवाय ही मालिका स्वीकारण्याचं आणखी एक कारण म्हणजे मला निखिल सिन्हा यांच्याबरोबर काम करायचं होतं.मी यापूर्वी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे.त्यांच्या मालिकाही या खूप क्रिएटीव्ह असतात.”असे गौरवने सांगितले.गौरवने याआधी 'कुमकुम','दिल से दिया वचन','ससुराल सिमर का','तेरे बिन' या मालिकेतून रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले होते. आता नुकतेच 'तेरे बिन' या मालिके खुशबु तावडेसह रोमँटीक अंदाज पाहायला मिळाला होता.विविधांगी भूमिका साकारल्यानंतर आतो पुन्हा एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ‘देवों के देव- महादेव’ या आपल्या भव्य मालिकेनंतर निखिल सिन्हानेच ‘चंद्रकांता’ या मालिकेची निर्मिती केली असून येत्या मार्च महिन्यात चंद्रकांताचे प्रसारण करण्यात येणार असल्याचे कळतेय.