Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इंडस्ट्रीत केलं जातं चक्क 'सर्व्हिस' देण्याचं कॉन्ट्रॅक्ट...", बिग बॉस विजेत्याच्या पत्नीने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:07 IST

कास्टिंग काऊचचाही होतो कॉन्ट्रॅक्ट? इंडस्ट्रीतलं भयानक वास्तव

मनोरंजनविश्वात कास्टिंग काऊच हा प्रकार सर्रास घडतो हे आपण सगळेच ऐकून आहोत. अनेक प्रसिद्ध कलाकारही या प्रकाराला सामोरे गेले आहेत. काही जण धीराने याला सामोरे गेले तर काहींना यामुळे चांगलाच धक्का बसला. त्यामुळे कित्येकांना इंडस्ट्रीत कामही मिळालेलं नाही. बिग बॉस विजेत्या सेलिब्रिटीच्या पत्नीने नुकतंच इंडस्ट्रीची पोलखोल करत यावर भाष्य केलं.

टीव्ही अभिनेत्री आणि 'अनुपमा' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चामोला सध्या तिच्या एका खळबळजनक विधानामुळे चर्चेत आली आहे. मनोरंजन विश्वात पुनरागमन केल्यानंतर आकांक्षाने 'कास्टिंग काउच'सारख्या गंभीर विषयावर भाष्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॉलिवूडमध्ये या गोष्टींचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत तिने इंडस्ट्रीतील या काळ्या सत्यावर प्रकाश टाकला आहे.

आकांक्षाने दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही इंडस्ट्रीत कामाचे स्वरूप व्यावसायिक असते, मात्र चित्रपटसृष्टीत गॉडफादर नसल्यास कलाकारांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. ती म्हणाली की, "ज्यांच्या डोक्यावर कोणाचा हात नसतो, त्यांच्याशी मर्यादा ओलांडताना लोक विचार करत नाहीत. काही लोक तर पहिल्याच भेटीत अतिशय निर्लज्जपणे आणि स्पष्टपणे 'कास्टिंग काउच'बद्दल बोलू लागतात."

या धक्कादायक प्रकाराबद्दल बोलताना तिने सांगितले की, काही ठिकाणी तर चक्क कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अशा अटी घातल्या जातात. "काही लोक इतके स्पष्ट असतात की, भूमिकेसाठी तुम्हाला संबंधित व्यक्तीला 'सर्व्हिस' द्यावी लागेल, असे कॉन्ट्रॅक्ट साइन करतानाच सांगितले जाते. समोरच्या व्यक्तीला हे बोलताना साधी लाजही वाटत नाही, हे खरोखरच घृणास्पद आहे," असे रोखठोक मत तिने व्यक्त केले.

स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना आकांक्षाने स्पष्ट केले की, सुदैवाने तिच्यासोबत आतापर्यंत असा कोणताही प्रकार घडलेला नाही. मात्र, इंडस्ट्रीतील इतर सहकाऱ्यांकडून तिने असे अनेक धक्कादायक अनुभव ऐकले आहेत. आकांक्षाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अभिनयाचे स्वप्न घेऊन येणाऱ्या नवोदित कलाकारांना कशा प्रकारे जाळ्यात ओढले जाते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Winner's Wife Exposes Industry's 'Service' Contract Reality.

Web Summary : Actress Akanksha Chamola reveals casting couch horrors in the industry, including explicit 'service' contracts, highlighting the challenges faced by newcomers without industry connections.
टॅग्स :टिव्ही कलाकारकास्टिंग काऊच