Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १९'चा विजेता गौरव खन्नाचं निधी शाहसोबत होतं अफेअर? अभिनेत्रीनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:36 IST

गौरव खन्नानं पत्नी आकांक्षा चमोला हिला धोका दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Gaurav Khanna Affair : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना सध्या आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. नुकतेच सलमान खानच्या 'बिग बॉस १९' या रिअ‍ॅलिटी शोची ट्रॉफी त्यानं जिंकली. त्यासोबतच त्याला ५० लाख रुपये बक्षिस मिळालं. सोशल मीडियावर त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरू असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान अभिनेत्याच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.  गौरव खन्नानं पत्नी आकांक्षा चमोला हिला धोका दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

'अनुपमा' मालिकेतील गौरवची सहकलाकार आणि 'किंजल शाह'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी शाह हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते, असा दावा एका सोशल मीडिया युजरने केला आहे. हे सर्व तेव्हा सुरू झालं, जेव्हा निधी शाहनं सोशल मीडियावर एक पोस्ट 'लाईक' केली. ज्यात गौरव खन्ना 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी जिंकण्यास पात्र नव्हता, असं म्हटलं होतं.

यानंतर लगेचच, लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आणि गौरवच्या मागील संबंधांवरून अटकळ बांधायला सुरुवात केली. एका युजरने थेट कमेंट केली, "अनुपमाच्या काळात त्याचे प्रेमसंबंध होते". यावर निधी शाहने हसत हसत इमोजीसह उत्तर दिले, "हो, तुला बरेच काही माहित आहे". निधीच्या या प्रतिक्रियेमुळं दोघांच्या कथित प्रेमसंबंधांच्या अफवांना आणखी जोर मिळाला आहे.  आतापर्यंत गौरवकडून या अफवांवर कोणतेही औपचारिक विधान आलेले नाही.

दरम्यान, गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये लग्न केले होतं. दोघांची भेट एका ऑडिशनमध्ये झाली होती. त्यांच्या वयात बरेच अंतर आहे. आकांक्षा गौरव पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. अभिनेता ४३ वर्षांचा आहे, तर आकांक्षा ३४ वर्षांची आहे. पण, वयातील मोठं अंतर त्यांच्या नात्यात कधीही अडथळा ठरलं नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gaurav Khanna's affair with Nidhi Shah? Actress reveals truth.

Web Summary : Gaurav Khanna, winner of 'Bigg Boss 19', faces affair allegations with 'Anupama' co-star Nidhi Shah after she liked a critical social media post. Shah's cryptic response fueled rumors, though Khanna hasn't commented. He is married to Akanksha Chamola.
टॅग्स :बिग बॉस १९सेलिब्रिटी