Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गौहर खानने लग्नाच्या 1आठवड्यापूर्वी शेअर केला जैदसोबतचा रोमाँटिक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 17:20 IST

गौहर खान आणि जैद दरबार 25 डिसेंबर 2020 ला लग्न करणार आहेत.

टीव्ही अभिनेत्री गौहर खान लवकरच लग्न करणार आहे. ती लवकरच जैद दरबारसोबत लग्नाच्या पवित्र बांधनात अडकणार आहे. दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या नात्याची घोषणा केली. आता लग्नासाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. लग्नाआधी गौहरने जैदसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ दोघांच्या प्री-वेडिंगचा आहे.

गौहर खान आणि जैद दरबार  25 डिसेंबर 2020 ला लग्न करणार आहेत. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दोघेही रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत तर कधी लग्नाच्या आनंदात डान्स करतायते. हा व्हिडिओ शेअर करताना गौहरने लिहिले की, लग्नाला 1 आठवडा बाकी आहे.

दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतायेत. गौहरने लेहेंगा परिधान केलाय तर जैदने क्रिम कलरची शेरवानी घातली आहे. हा व्हिडिओचे दोघांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 

लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस असणार आहे आणि लग्न मुंबईत होणार आहे. कोरोनामुळे जास्त लोक लग्नात सहभागी होणार नाहीत. दोन्ही कुटुंब आणि जवळच्या लोकांमध्ये निकाह पार पडणार आहे. जैद हा संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे.  

टॅग्स :गौहर खान