Join us

'गाथा नवनाथांची' मालिकेने पार केला ४०० भागांचा टप्पा, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 19:14 IST

'गाथा नवनाथांची' या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय. मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच पार केला आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे.  नाथसंप्रदायाविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष भावतेय. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी  रंजक ठरत असतानाच  या मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच गाठला आहे. 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील  कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय. मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच पार केला असून प्रेक्षकही मालिकेला विशेष पसंती दर्शवित आहेत.  आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं या मालिकेत पाहायला मिळालं,  नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेच्या पुढल्या भागांत पाहणं रंजक ठरणार आहे. बालक रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवास आता मालिकेत सुरू झाला आहे.  

नाथ संप्रदायाची ही परंपरा 'गाथा नवनाथांची' या मालिकेच्या पुढल्या भागांत पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, अशुभ शक्तींचा नाश नाथ कसा करणार हे आपल्याला लवकरच कळेल. 

टॅग्स :सोनी मराठी