गरबा क्विन दया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:47 IST
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया ही खूपच छान गरबा खेळते असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. मालिकेत ...
गरबा क्विन दया
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया ही खूपच छान गरबा खेळते असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. मालिकेत तिला गरबा कधी खेळायला मिळतोय याची ती वाटच पाहात असते. या नवरात्रीमध्ये तर ती नवीन स्टाईलमध्ये गरबा खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दया पारंपरिक गरब्यासोबतच तीन टाळी, हवाहवाई यांसारख्या गरबा प्रकारांवर थिरकणार आहे. एवढेच नव्हे तर ती तिच्या गोकुळधाममधील मैत्रिणींनादेखील गरबाचे हे नवे प्रकारे शिकवणार आहे. याविषयी दयाची भूमिका साकारणारी दिशा वाकानी सांगते, " नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी दयाने खूप तयारी केली आहे. ती तिच्या सगळ्या मैत्रिणींनादेखील गरबा खेळायला शिकवणार आहे. मी कॉलेजमध्ये असताना अनेकवेळा गरबा खेळायला जात असे. त्यामुळेच मालिकेतदेखील मी चांगल्याप्रकारे गरबा खेळू शकते."