Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या डोहाळे कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी बनवला मजेशीर रील, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:09 IST

रंग माझा वेगळामधील कलाकारांच्या रील व्हिडीओला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून यात आतापर्यंत कित्येक लोकांचा बळी गेला आहे. टेलिव्हिजन आणि बॉलिवूडवरही त्याचा खूप मोठा परिणाम पहायला मिळाला. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. दरम्यान रंग माझा वेगळा मालिकेत नुकतेच दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या शूटदरम्यान या मालिकेतील कलाकारांनी सेटवर मजेशीर रील बनवला आहे. हा रील दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर मास्टर चित्रपटातील टेंड्रिग गाण्यावर सहकलाकारांसोबत रील बनवला आहे. हा रील शेअर करत तिने माझ्या कामाला मिस करतेय असे म्हटले आहे. सध्या कोरोनामुळे शूटिंग बंद आहे. त्यामुळे रेश्मा शूटिंगला मिस करते आहे. तिच्या या रीलला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील 'चाहूल' या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

मराठीसोबतच रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

टॅग्स :स्टार प्रवाह