फ्रेंड्सचे रियुनियन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 17:09 IST
अमृता खानविलकर आणि शरद मल्होत्रा यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांची पहिली ओळख सिनेस्टार की खोज या कार्यक्रमाच्यावेळी ...
फ्रेंड्सचे रियुनियन
अमृता खानविलकर आणि शरद मल्होत्रा यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांची पहिली ओळख सिनेस्टार की खोज या कार्यक्रमाच्यावेळी झाली होती. या कार्यक्रमाने त्या दोघांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. आता अनेक वर्षांनंतर ते दोघे पुन्हा एकदा कॉमेडी नाईटस बचाव या कार्यक्रमात एकत्र झळकणार आहेत. या कार्यक्रमाला एक वर्षं पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे नाव आता कॉमेडी नाईटस बचाव ताजा असे झाले असून यात अनेक नव्या कलाकारांचा प्रवेश होणार आहे. आपल्या जुन्या मित्राला अनेक वर्षांनंतर भेटून अमृताला खूपच आनंद झाला आहे. ती सांगते, "शरदला पाहून मला सुखद धक्का बसला. आम्ही दोघे मिळून आता खूप सारी मजामस्ती करणार आहोत." तर शरद सांगतो, "मी आणि अमृताने एकत्रच आमच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत काम करण्यासारखा आनंद काही वेगळाच असतो."