Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मराठी मालिकेमध्ये झळकणार ही फॉरेनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:22 IST

चाहूल या मालिकेत प्रेक्षकांना एक फॉरेनर पाहायला मिळणार आहे. कोणत्याही मालिकेत फॉरेनरने काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चाहूल ...

चाहूल या मालिकेत प्रेक्षकांना एक फॉरेनर पाहायला मिळणार आहे. कोणत्याही मालिकेत फॉरेनरने काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चाहूल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अक्षर कोठारी एका फॉरेनरच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या प्रेमाखातर ती भारतात येते अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेत फॉरेनरची भूमिका साकारण्यासाठी एका फॉरेनर अभिनेत्रीचीच निवड करण्यात आली आहे. लीझान ही या मालिकेत फॉरेनरची भूमिका साकारत असून ती मुळची रशियाची रहिवासी आहे. लीझान रशियाची असल्याने तिच्यासोबत इंग्रजीतच बोलावे लागते. मालिकेतदेखील ती इंग्रजीतच संवाद म्हणताना प्रेक्षकांना दिसणार आहे. कोणत्याही पात्राने इंग्रजीत संवाद म्हणण्याची मराठी मालिकेत ही पहिलीच वेळ आहे. इंग्रजी भाषा प्रत्येकालाच कळत नाही. त्यामुळे तिचे संवाद सर्वसामान्य प्रेक्षकांना कळतीलच असे नाहीत. त्यामुळे तिचे संवाद मराठीत सबटायटल्सच्या रूपात प्रेक्षकांना वाचायला मिळणार आहेत. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. या मालिकेची संपूर्ण टीम सेटवर मराठीतच बोलते. त्यामुळे लीझानच्या मनात या भाषेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे आणि सध्या ती मराठी शिकण्याचा प्रयत्नदेखील करत आहे. मालिकेतदेखील काही काळानंतर ती मराठीत संवाद साधतानाच दिसणार आहे. या मालिकेतील तिची लूक हा खूप हटके आहे. ती परदेशातील दाखवल्यामुळे या मालिकेत ती पाश्चिमात्य कपड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठी मालिकेत पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री पाश्चिमात्य लूकमध्ये झळकणार आहे.