पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीच्या मुलाची दिसणार ऑनस्क्रीन झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 18:49 IST
डान्स प्लस शोमध्ये यंदा चिल्ड्रन्स डे स्पेशलचे पाहायला मिळणार आहे.या शोच्या या चिल्ड्रन्स डे स्पशेल एपिसोडचे खास वैशिष्ट्य म्हणजे ...
पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीच्या मुलाची दिसणार ऑनस्क्रीन झलक
डान्स प्लस शोमध्ये यंदा चिल्ड्रन्स डे स्पेशलचे पाहायला मिळणार आहे.या शोच्या या चिल्ड्रन्स डे स्पशेल एपिसोडचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच शिल्पाने त्याच्या मुलाला शोचे भाग बनवले आहे. सुपर डान्सर शोच्यामध्ये शिल्पाने तिचा मुलगा विवानने ही यंदा या शोला हजेरी लावली. चिल्ड्रन्स डेचे सेलिब्रेशनसाठी शिल्पाने विवानला आणले होते. यावळी शिल्पाच्या मांडीवर बसून विवान स्पर्धकांनी सादर केलेल सगळे परफॉर्मन्स एंन्जॉय केले. विशेष म्हणजे या शोमध्ये फक्त विवानने हजेरीच लावली नाही तर त्याने 'बाजीराव मस्तानी' सिनेमातले आवडते गाणे ''तत्तड तत्तड''वर तो एक खास परफॉर्म सादर करतांना दिसणार आहे. पहिल्यांदाच विवानची झलक रसिकांना ऑनस्क्रीन पाहायला मिळणार असून आई शिल्पाही मुलाचे कौतुक वाटत होते. आज मला जाणवते, की आईला आपल्या मुलाला स्टेजवर परफॉर्म करणे किती आनंदाची गोष्ट असते. या शोमधली स्पर्धकांच्या आईंनाही आपल्या मुलांना बघून गर्व वाटतो अगदी त्याचप्रमाणे आज विवानला पाहून मलाही गर्व वाटत असल्याचे शिल्पाने सांगितले. शिल्पा शेट्टी,अनुराग बासू आणि गीता कपूर या शोला जज करत आहेत.