Join us

आशुतोष पत्कीसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानने दिली प्रतिक्रिया, म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 17:28 IST

अफेअरच्या चर्चांवर तेजश्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पहिल्यांदाच तेजश्रीची यावर प्रतिक्रिया आलीय. ​तेजश्रीने त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्री सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. 

 'अग्गंबाई सासुबाई' या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्याची ऑनस्क्रीन जोडी रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहचली. अल्पावधीतच शुभ्रा साकारणारी तेजश्री प्रधान आणि बबड्या साकारणारा आशुतोष पत्की रसिकांचे लाडकी जोडी बनली होती. मालिका संपल्यानंतरही ही जोडी आजही रसिकांच्या लक्षात आहे. 

दोघांविषयी जाणून घेण्यातही रसिकांना फार उत्सुकता असते. दोघांचे फोटो एकत्र पाहून चाहत्यांनाही प्रचंड आनंद होतो. आशुतोषने तेजश्रीच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांचा एकत्र असलेला फोटो शेअर केला होता. या फोटोला खास कॅप्शनही आशुतोषने दिले होते. भूतकाळ विसरुन पुढे जाण्याचाही सल्ला दिला होता.यामुळे दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. 

अफेअरच्या चर्चांवर तेजश्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पहिल्यांदाच तेजश्रीची यावर प्रतिक्रिया आलीय. ​तेजश्रीने त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली आहे. मटाला दिलेल्या मुलाखतीत तेजश्रीने सांगितले की, शूटिंगच्या वेळीसुद्धा आमच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा व्हायच्या. त्यामुळे आता रंगत असलेल्या चर्चामध्ये तसेही काही नवीन नाही. आशुतोष आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. एकत्र काम केल्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आमच्यात मैत्रीपलिकडे जशा चर्चा रंगत आहेत तसे काहीही नसल्याचे तिने म्हटले आहे. 

नक्कीच मला लग्न करायलाही आवडेल. ज्याच्या सोबत लग्न करेन तो मला समजून घेणारा हवा. तो सिनेसृष्टीतला असला तरीही चालेल. माझ्या चॉईसनुसार मुलगा मिळाला तर पुढच्या काही महिन्यातच लग्न करुन आयुष्याची नवीन सुरुवात करेन असेही तिने सांगितले. 

टॅग्स :तेजश्री प्रधान