Join us
Daily Top 2Weekly Top 5

डान्स प्लसचा पहिला भाग इमॅजिकामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:15 IST

डान्स प्लस या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन डान्स प्लस टू लवकरच सुरू होणार ...

डान्स प्लस या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन डान्स प्लस टू लवकरच सुरू होणार आहे. दुसरा सिझन लोकांना अधिकाधिक आवडावा यासाठी कार्यक्रमाची संपूर्ण टीमच सध्या मेहनत घेत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात धुमधडाक्यात व्हावी यासाठी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण हे अॅक्वा इमॅजिकामध्ये करावे असा टीमचा विचार सुरू आहे, इमॅजिकामध्ये कशाप्रकारे चित्रीकरण करता येईल, त्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल यावर टीम आणि थिम पार्कच्या मंडळीची सध्या चर्चा सुरू आहे.