झलकची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 14:50 IST
झलक दिखला जा या कार्यक्रमात स्पर्धक कोण असणार याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमातील काही स्पर्धकांसोबत ...
झलकची पहिली झलक
झलक दिखला जा या कार्यक्रमात स्पर्धक कोण असणार याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमातील काही स्पर्धकांसोबत नुकताच एक प्रोमो शूट करण्यात आला. या स्पर्धकांमध्ये सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, हेली शाह या छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. त्याचसोबत शेफ हरपाल सिंग सोखी, कॉमेडियन गौरव गेराही या सिझनमध्ये झळकणार आहेत. तसेच भरतनाट्यम आणि हिप हॉप या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध असलेली प्रियांका आणि पूनम शहा यांची जोडीही या कार्यक्रमात आपले नृत्य सादर करणार आहे. नागिन या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनललेला अर्जुन बिजलानी आणि मेरी आशिकी तुमसे ही फेम शक्ती अरोराही या सिझनमध्ये थिरकणार आहेत.