Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3: 'मला डोकं आहे'; पहिल्याच दिवशी मीरा-स्नेहामध्ये वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:07 IST

Big boss marathi 3 : 'बिग बॉस'चं नवीन पर्व सुरु होऊन अवघे काही तास होत नाहीत त्यातच मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ यांच्यात वाद सुरु झाला आहे.

ठळक मुद्देबिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच मीराने कुरबूर सुरु केली

बहुप्रतिक्षीत ठरलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या तिसरं पर्वाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या शोविषयी कमालीची चर्चा रंगली होती. यंदाच्या पर्वात नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार इथपासून ते बिग बॉसची यंदाची थीम काय असेल यापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगली होती. मात्र, अखेर १९ सप्टेंबर रोजी 'बिग बॉस मराठी' सीजन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे मोठ्या उत्साहात घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांमध्ये पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली आहे.

'बिग बॉस'चं नवीन पर्व सुरु होऊन अवघे काही तास होत नाहीत त्यातच मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्यामुळे या शोची सुरुवातच वादापासून झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

Bigg Boss Marathi 3: 'हे' आहेत 'बिग बॉस'च्या घरातील १५ स्पर्धक

'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री केल्यानंतर मीरा आणि जय यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ज्यामुळे 'जय मला डोकं आहे', असं म्हणत मीराने जयला खडसावलं. मात्र, यावेळी मीराच्या बोलण्याची पद्धत आणि आवाजाची उंची पाहून स्नेहाने तिला चांगलंच धारेवर धरलं. 'ही काय बोलायची पद्धत आहे का?', असा सवाल स्नेहाने मीराला विचारला. ज्यामुळे मीराने जयला सोडून थेट स्नेहासोबतच भांडण करायला सुरुवात केली.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच मीराने कुरबूर सुरु केली होती. बेड निवडीवरुन तिने घरातल्यांसोबत शाब्दिक वाद घातला. त्यानंतर आता पहिल्याच दिवशी स्नेहा आणि जयसोबत भांडण केलं आहे. त्यामुळे  आता बिग बॉसच्या घरातील मीराच प्रवास नेमका कसा सुरु होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तसंच मीरा आणि स्नेहामधील वाद मिटेल का हेदेखील आजचा भाग पाहिल्यावर प्रेक्षकांना समजणार आहे.

'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर

'हे' सेलिब्रिटी स्पर्धक झाले बिग बॉसमध्ये सहभागी

सोनाली पाटील, स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार, तृप्ती देसाई, उत्कर्ष शिंदे, शिवलीला पाटील,आविष्कार दारव्हेकर,जय दुधाणे,संतोष चौधरी, विशाल निकम. 

टॅग्स :बिग बॉस