'द व्हॉईस इंडिया किड्स' 2 च्या सेटवर आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 13:45 IST
नवीन वर्षाच्या विशेष भागाचे शूटिंग करताना &TV चा प्रसिद्ध शो द 'व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ...
'द व्हॉईस इंडिया किड्स' 2 च्या सेटवर आग
नवीन वर्षाच्या विशेष भागाचे शूटिंग करताना &TV चा प्रसिद्ध शो द 'व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या वर्षाचा शेवट करताना विशेष भागात नेहा कक्कर आणि बादशाह हे देखील परीक्षक म्हणून आले होते. दुर्देवाने, आपल्या 'काला चष्मा' या गाण्यावर नेहा कक्करचा परफॉर्मन्स चालू असतानाच अचानक सेटवर आगीने पेट घेतला. पीसीआर आणि स्टेजजवळ असणार्या वेटिंग क्षेत्रात हा अपघात झाला. शूटिंग चालू होते मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. आगीने पेट घेतल्यानंतर काही मिनिटांतच क्रूसह परीक्षक आणि मुलांना तिथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर साधारण 2 तासांसाठी शूट थांबविण्यात आले होते. आगीमुळे सेटवर कितपत हानी झाली, याचे मुल्यांकन करणार्या टीमजवळ मार्गदर्शक आणि सेलिब्रिटी पाहुणे यांनी भावना व्यक्त केल्या. सेलिब्रिटी पाहुणी नेहा कक्करला याविषयी विचारले असता तिने सांगितले, “आम्ही काला चष्मा गाणे म्हणत होतो आणि गाण्यात ‘आग लगा दे बेबी फायर’ अशी एक ओळ आहे ती म्हणत असतानाच आगीने पेट घेतला. त्यामुळे शूट थांबविण्यात आले. पण, मला आशा आहे की आता सगळे सुरक्षित आणि व्यवस्थित आहे. सगळ्यांची नीट काळजी घेण्यात येत असल्याची मला आशा आहे.”तर, मार्गदर्शक पापॉन म्हणाला, “मुलांनी इतके चांगले गायले की, खरोखरच सेटवर आग लागली. पण गंभीररित्या बघितले तर, आता सगळे नियंत्रणाखाली आहे आणि प्रॉडक्शनने खूपच चांगली काळजी घेतली आहे.” सगळ्यांच्या काळजीसंबंधी पलक मुछाल म्हणाली, “सेटवर सुरक्षित उपकरणे होती हे नशीब, त्यामुळे आग पसरली नाही आणि वेळेवर सगळ्यांची नीट काळजी घेण्यात आली.”