Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माच्या ओशिवरातील फ्लॅटला लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:33 IST

लोकप्रिय कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आलं आहे.

लोकप्रिय कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आलं आहे. हा फ्लॅट ओशिवरा येथील शांतीवन सोसायटीतील चौथ्या माळ्यावर होता. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळण्यास यश मिळालं आहे. 

कपिल शर्माच्या ओशिवरामधील शांतीवन सोसायटीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळवलं आहे. हा फ्लॅट बंद असल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घरातील सामान जळून खाक झालं आहे. 

२००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.

कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

कपिल शर्माने आपल्या बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर, २०१८मध्ये लग्न केले. या विवाह सोहळाला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते.

आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. किस किसको प्यार करूं या चित्रपटातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो फिरंगी या चित्रपटातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही.

टॅग्स :कपिल शर्मा