Join us

अखेर सलमानने लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 11:27 IST

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान हजेरी लावणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. सलमान ...

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान हजेरी लावणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. सलमान बिग बॉस या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमाच्यावेळी कपिल आणि कलर्स वाहनीमध्ये प्रचंड भांडणे झाली होती. सलमान हा कलर्स वाहिनीवरील कार्यक्रमाचा भाग असल्याने तो कपिलच्या कार्यक्रमात जाणार नाही असे म्हटले जात होते. पण नुकतेच सलमानने द कपिल शर्मा शोसाठी चित्रीकरण केले अाहे. सलमान आणि अनुष्का यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान आणि अनुष्का कपिलच्या कार्यक्रमात येणार आहेत.