अखेर लग्न झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 15:30 IST
बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. बबल्स आणि अर्मत्य हे दोघे प्रेमात असल्याचे ...
अखेर लग्न झाले
बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. बबल्स आणि अर्मत्य हे दोघे प्रेमात असल्याचे आपल्याला चांगलेच माहीत आहे. पण यांच्या प्रेमाच्या मार्गात अनेक अडचणी आहेत. कारण बबल्सचा भाऊ अमरिश तिच्यासाठी मुलगा शोधत आहे. तिला चांगला मुलगा मिळावा म्हणून स्वयंवराचे आयोजन करावे असाही सध्या त्यांचा विचार सुरू आहे. पण अर्मत्यला बबल्स आवडत असल्याने तो स्वयंवराचा डाव उधळून लावणार आहे. स्वयंवरासाठी येणाऱ्या सगळ्यांना तो पळवून लावणार आहे आणि तोच बबल्ससोबत लग्न करणार आहे. पण ही गोष्ट काही साधी नाहीये. लग्न करताना खूप सारा गोंधळ होणार आहे. या सगळ्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.