Join us

अखेर ३ वर्षांनंतर चारु असोपा आणि राजीव सेन झाले विभक्त, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:14 IST

Charu Asopa And Rajeev Sen : चारू असोपा आणि मॉडेल राजीव सेन यांच्या घटस्फोटाची आज ८ जून २०२३ रोजी अंतिम सुनावणी झाली. आता हे जोडपे एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले आहेत.

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि मॉडेल राजीव सेन (Rajeev Sen) हे त्यांच्या घटस्फोटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. अखेर आज या जोडप्याचा कागदावर घटस्फोट झाला. आज ८ जून रोजी त्यांच्या घटस्फोटाची अंतिम सुनावणी झाली होती आणि त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. नुकतेच राजीव सेनने इंस्टाग्राम स्टोरीवर चारुसोबतचा फोटो शेअर करत घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजीव सेन आणि चारू असोपा आता कायमचे वेगळे झाले आहेत. या जोडप्याचा आज कागदावर घटस्फोट झाला आहे. राजीवने इन्स्टाग्रामवर चारूसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इथे अलविदा नाही. जरी दोन लोक एकमेकांसोबत कायमचे राहू शकत नसले तरी प्रेम नेहमीच असते. आम्ही आमच्या मुलीसाठी नेहमीच आई आणि बाबा राहू." फोटोमध्ये, राजीव हसताना आणि चारूला मिठी मारताना दिसत आहे.

चारू असोपा आणि राजीव सेन यांचे २०१९ मध्ये लग्न झाले. या लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये मतभेद झाले आणि राजीवने चारूची साथ सोडली. दोघांनी आपले नाते सुधारले आणि काही काळानंतर मुलगी जियाना त्यांच्या आयुष्यात आली, पण आता पुन्हा ते कायमचे वेगळे झाले आहेत. राजीव यांची मुलगी जियाना तिची आई चारूसोबत राहते. चारूने नुकतेच मुंबईत नवीन घर घेतले आहे, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावरही शेअर केली आहे. गेल्या महिन्यात तिने मुलगी जियानासोबत नवीन घरात प्रवेश केला.