Join us

५० डिग्रीत केले चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:27 IST

कविता बडजात्या यांची निर्मिती असलेली एक रिश्ता साझेदारी का ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेची कथा ही एका राजस्थानी ...

कविता बडजात्या यांची निर्मिती असलेली एक रिश्ता साझेदारी का ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेची कथा ही एका राजस्थानी कुटुंबाभोवती फिरत असल्याने या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण राजस्थानमधील जैसलमेर येथे करण्यात आले आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी राजस्थानमधील तापमान हे जवळजवळ ५० अंश सेल्सियसहूनही अधिक होते. या तापमानात लोक घराच्या बाहेर पडणेही टाळतात. पण मालिकेच्या टीमने या तापमानात आऊटडोर शूट केले. टीम सकाळी लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करत असे. सकाळी दहा-साडे दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत असे. कितीही सनस्क्रिन लावली तरी चेहरा काळवंडलाच जात असे. पण तरीही हे चित्रीकरण आम्ही एन्जॉय केले असे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा किंशुक वैद्य सांगतो.