Join us

सखी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:26 IST

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री सखी गोखले आता चित्रपटात झळकणार आहे. तिने ...

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री सखी गोखले आता चित्रपटात झळकणार आहे. तिने एक मराठी चित्रपट नुकताच साईन केला असून या चित्रपटासाठी ती लवकरच काम सुरू करणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. सखीसोबत काम करण्याचा सिद्धार्थला प्रचंड आनंद होत आहे.