Join us

कोरोनाच्या या भयावह वातावरणात या कपलने दिली गुड न्यूज, होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:01 IST

पिता झाल्याच्या भावनेने रूसलानदेखील फारच भावुक झाला आहे.

सध्या सर्वत्रच कोरोनाने धडकी भरवली असताना एक कपल आहे ज्यांच्या चेह-यावर आनंद पाहायला मिळत आहे, बालिका वधू फेम रूसलान मुमताजच्या घरी आज आनंदी आनदं आहे. मुमताज कुटुंबियांच्या आज आनंदाला पारावर उरला नाही. कारण त्यांच्या आयुष्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. रूसलानची पत्नी निरालीने बाळाल जन्म दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दोघेही बाळाच्या जन्मात काही अडथळे येऊ नये याच्याच चिंतेत होते. अखेर सुरळीतरित्या निरालीने सा-यांनाच गुड न्यूज दिली. ही गुड न्यूज चाहत्यांसह शेअर करताच त्यांच्यालर सध्या त्याच्या फॅन्स शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  कोरोनामुळे सद्यस्थिती पाहाता आता फक्त ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर करत असून तीन ते चार महिन्यानंतर बाळाचा फोटो चाहत्यांसह शेअर करणार असल्याचे रूसलानने म्हटले आहे.

तसेच नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि पिता झाल्याच्या भावनेने रूसलानदेखील फारच भावुक झाला आहे. पिता झाल्यामुळे जबाबदारी आणखी वाढल्याचंही तो म्हणतो. जीवनात बाळाचं आगमन झाले आहे, जीवापाड प्रेम करणारी पत्नी आहे आणि करिअरही योग्य दिशेने सुरू आहे असं सांगत त्याने आपण आनंदी तसंच समाधानी असल्याचे म्हटले आहे.

संपूर्ण कुटुंबीय बाळाची योग्य काळजी घेण्यात बिझी असून आता या दोघांचे आयुष्यच बदलले असल्याच्या भावना  या दाम्पत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.तसेच रूसलानने दिलेल्या आनंदाच्या बातमीने चाहतेही अगदी रिफ्रेश झाले आहेत.