बेहद फेम पियुष सचदेव आणि आकांक्षा रावत घेणार घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:56 IST
पियुष सचदेवने हर घर कुछ कहता है, मीत मिला दे रब्बा, घर एक सपना, मन की आवाज प्रतिज्ञा यांसारख्या ...
बेहद फेम पियुष सचदेव आणि आकांक्षा रावत घेणार घटस्फोट
पियुष सचदेवने हर घर कुछ कहता है, मीत मिला दे रब्बा, घर एक सपना, मन की आवाज प्रतिज्ञा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने आकांक्षा रावतसोबत २५ जून २०१२ला लग्न केले. आकांक्षाने सोलाह श्रृंगार या मालिकेत काम केले होते. त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून प्रचंड भांडणे होत आहे आणि आता त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.पियुष आणि आकांक्षाच्या लग्नाला पाच वर्षं झाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात होते. पण त्या दोघांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता पियुषने याबाबत मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. आकांक्षा आणि पियुषच्या नात्याबाबत पियुष सांगतो, मी आणि आकांक्षा गेल्या तीन महिन्यांपासून वेगळे राहात आहोत. आम्ही घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. पियुष सध्या बेहद या मालिकेत राजीव ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो प्रेक्षकांना खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत क्रिएटिव्ह टीममध्ये असणाऱ्या एका स्त्री सोबत त्याचे अफेअर सुरू असल्याच्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहेत. ते दोघे एकत्र राहात असल्याचे देखील म्हटले जात आहे. याविषयी पियुष सांगतो, मी कित्येक दिवसांपासून या गोष्टी ऐकत आहे. या सगळ्याच गोष्टी चुकीच्या असून या गोष्टींमुळे मला प्रचंड त्रास होत आहे. सध्या माझ्या आय़ुष्यातील सगळ्यात वाईट काळ सुरू आहे. या सगळ्या अफवांमुळे माझ्या दुःखात अधिक भर पडत आहे. लोकांनी अशा चुकीच्या अफवा पसरवू नयेत. Also Read : एकेकाळचे लव्हबर्ड्स आणि कपल्स आता एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत