Join us
Daily Top 2Weekly Top 5

फराह खानला सेटवर झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 14:37 IST

स्टार प्लस वाहिनीवरील 'कानपुर वाले खुरानाज' शोमध्ये नृत्यदिग्दर्शिका फराह खान शेजारीच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देफराह खान दिसणार विनोदी अंदाजात 'कानपुर वाले खुरानाज' शोमध्ये फराह खान दिसणार शेजारीणीच्या भूमिकेत

स्टार प्लस वाहिनीवरील 'कानपुर वाले खुरानाज' शोमध्ये नृत्यदिग्दर्शिका फराह खान शेजारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोच्या चित्रीकरणादरम्यान फराह खानला दुखापत झाली. त्यामुळे तिला आराम करायला सांगितले होते. तरीदेखील फराहने जखम झाली असतानादेखील कानपुर वाले खुराणाजचे चित्रीकरण केले.फराहच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फराह खानच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तरी देखील तिने चित्रीकरण करायचे ठरविले. आता ती जे काही शूट करणार आहे. ते ती एका जागेवर बसून करणार आहे. तिने काही एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केले. तिच्यामुळे चित्रीकरण थांबावे, असे तिला वाटत नाही.'कानपुर वाले खुरानाज' शोमध्ये खुरानाजच्या शेजारीणीची भूमिका निभावताना दिसणार आहे. या शोमधून ती छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या शोमध्ये रसिकांना खळखळून हसविताना दिसणार आहे. ‘कानपूरवाले खुराणाज’ या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेत जिजा-मेव्हणी यांच्यातील संबंधांवर भर देण्यात आला असून २०१८ वर्षाची अखेर या नव्या मालिकेच्या प्रसारणाने होईल. या मालिकेत अनेक विनोदवीर वेळोवेळी सहभागी होणार असून त्यांचे संवाद, प्रसंग आणि नकला यांच्याद्वारे दर आठवड्यास एक नवी संकल्पना मालिकेत सादर केली जाईल. तसेच बॉलीवूडमधील संगीत, चित्रपट आणि अन्य क्षेत्रांतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी हे या मालिकेत दर आठवड्यास विशेष अतिथीच्या रूपात सहभागी होणार असल्याने मालिकेचा ग्लॅमर आणि मनोरंजनाच्या स्तर खूपच उंचावणार आहे. 

टॅग्स :फराह खानकानपुरवाले खुराणाज्