Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधवी भाभीच्या हातात सिगारेट पाहून चाहत्यांना बसला धक्का, सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 16:54 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत ऑनस्क्रीन सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या सोनालिका जोशीचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्यच वाटले असणार. तसेच बोल्ड फोटोही तिचे व्हायरल झाले आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' विनोदी मालिका रसिकांची आवडती बनली आहे. मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराला रसिकांची तितकीच पसंती मिळते. या शोमध्ये प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांसाठी तितक्याच आदर्श आहेत.मालिकेतले कलाकार इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतात. मालिकेतले माधवी भाभी ही भूमिकाही तितकीच आवडती आहे.

मालिकेत गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी भीडे मास्टरच्या पत्नीची भूमिकेतून रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. मालिकेतील माधवी भिडे हे पात्र अगदी सुरुवातीपासून सोनालिका साकारत आहेत.त्यामुळे मालिका विश्वात तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.माधवी भाभीचे खरे नाव सोनालिका जोशी आहे.खऱ्या आयुष्यात ती फार मनमौजी आहे.

मालिकेत पापड आणि लोणचं बनवण्याची आवड तिला असते. घर चालवण्यासाठी पापड लोणचंचा व्यवसाय करून  भिडे मास्टरला मदत करते असे मालिकेत दाखवण्यात येते. माधवी भाभी याच नावाने ती जास्त ओळखली जाते. हिंदी लोकांमध्ये राहून मराठी स्त्री कसं बोलेल, हिंदीत बोलताना येणारे मराठी शब्द, तिचं वागणं या गोष्टी माझ्या भूमिकेतून दिसत असल्यामुळे रसिकांनाही माधवी भावते.

सोनालिका जोशी इन्स्टाग्रामवर दररोज तिचे अनेक सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सोनालिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सोनालिकाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तिने हातात सिगारेट पकडल्याचे पाहायला मिळत आहे. 

ऑनस्क्रीन सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या सोनालिकाचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्यच वाटले असणार. तसेच बोल्ड फोटोही तिचे व्हायरल झाले आहेत. सोनालिकाचा असा बोल्ड लूक याआधी कोणी पाहिला नसेल आणि तिचे चाहते तिला अशा रुपात पाहून चांगलेच थक्क झाले आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेआधी सोनालिकाने काही मराठी मालिकांत तसेच नाटकांतही काम केलं होतं. 'झुळूक' या मराठी सिनेमातही सोनालिका झळकली आहे.याशिवाय 'वाढता वाढता वाढे', 'बोल बच्चन' यासांरख्या अनेक नाटकांतही काम केलं होतं. मात्र सोनालिकाला खरी ओळख 'तारक मेहता..' मुळेच मिळाली आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा