Join us

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब, गावात झाली स्थायिक अन् करतेय शेती, जवळच्या मैत्रिणीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:36 IST

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सतत चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून ती इंडस्ट्रीतून गायब आहे.

शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या शिल्पाला 'भाभीजी घर पर है' या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा घराघरात पोहोचली. शिल्पाने मालिकांबरोबरच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसेच शिल्पा बिग बॉस ११ची विजेती आहे. या शोमध्येच अभिनेत्रीची अर्शी  खानसोबत छान मैत्री झाली आणि ती अजूनही कायम आहे. नुकतेच एका मुलाखतीत अर्शीने शिल्पा शिंदे सध्या काय करते आहे, याबद्दल सांगितलं.

अर्शी खान आणि शिल्पा शिंदे यांची मैत्री बिग बॉसनंतर आणखी घट्ट झाली होती. दोघी एकमेकींच्या पर्सनल गोष्टी एकमेकांकडे शेअर करत असतात. अर्शीने सांगितले की, शिल्पा शिंदेला लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. या सर्व गोष्टींपासून ती खूप दूर आहे आणि सध्या ती शेती करत आहे. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत अर्शी खान म्हणाली की, मी तिला बऱ्याचदा म्हटलं की, लवकर लग्न कर पण माहित नाही काय आहे. सर्वांना असं वाटतं की तिने लग्न करावे.

''तिला इंडस्ट्रीत चांगला अनुभव आला नसेल...''

शिल्पा शिंदे प्रेमात आहे का, हे विचारल्यावर अर्शी खानने सांगितले की, कधीच नाही. तिचा फोन एका कोपऱ्यात पडलेला असतो. मला वाटत नाही की तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे किंवा ती कोणाच्या प्रेमात आहे. तुम्ही बिग बॉसमध्ये पाहिलंच असेल की ती फक्त कामाशी काम ठेवते. मला असं वाटतं की कदाचित तिला इंडस्ट्रीत चांगला अनुभव आला नसेल. तिला लोकांनी खूप जास्त फसवले आहे. त्यामुळे ती निघून गेली आणि तिचे आयुष्य जगत आहे. कोणीच कॉन्ट्रोव्हर्सी स्वतःहून नाही करत. कोणाला त्यात अडकायचं नसतं. ते ऑन द स्पॉट घडते.

कर्जतला झालीय स्थायिक

अर्शीने सांगितलं की, ती मुंबई सोडून कर्जतमध्ये स्थायिक झालीय. तिथे ती शेती करत आहे. तिने अर्शीला सांगितलं की, मी शेतकरी बनलेय आणि शेती करत आहे. ती खूप मस्त राहत आहे आणि तिचं आयुष्य छान जगत आहे. तिच्यासोबत माझं बोलणं होत असतं.

टॅग्स :शिल्पा शिंदेबिग बॉस १९