स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील आप्पा, कांचन, अनिरूद्ध, अरूंधती, इशा, अभिषेक, यश, गौरी आणि संजना या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात. या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारून अभिनेत्री अर्चना पाटकर घराघरात पोहचल्या आहेत. फार कमी लोकांना माहित असेल की त्यांची सूनदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटविली आहे.. आत्मविश्वास, सून लाडकी सासरची, इना मीना डिका यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. तर आभास हा या मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सुरुवातीला सहकलाकार म्हणून भूमिका गाजवून त्यांनी सून लाडकी सासरची चित्रपटात सासूची भूमिका केली.
अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली भूमिका बजावतो आहे. तो हिंदी मालिकेसाठी काम करतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव ही त्याला आहे.
तसेच मानाचा मुजरा, झुंज मराठमोळी यासारख्या शोमध्येही तिने सहभाग दर्शवून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. एकेकाळी आघाडीवर असणारी हेमलता आता अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय नाही. आता तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.