Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं निधन, ८ महिन्यांची गरोदर असतानाच आला हृदयविकाराचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 14:09 IST

अभिनेत्रीचं बाळ सध्या ICU मध्ये आहे

मल्याळम अभिनेत्री रेंजुषा मेननच्या आत्महत्येची बातमी ताजी असतानाच आता आणखी एका मल्याळम अभिनेत्रीचं निधन झालं आहे. टीव्ही अभिनेत्री डॉ प्रिया ( Dr Priya) हिचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. तिचं वय केवळ 35 वर्ष होतं आणि धक्कादायक म्हणजे ती ८ महिन्यांची गरोदर होती. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

मल्याळम अभिनेता किशोर सत्या याने डॉ प्रियाच्या निधनाची बातमी दिली. त्याने लिहिले,'मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक धक्का. डॉ प्रिया यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तर तिचं बाळ सध्या ICU मध्ये आहे. तिला इतर कोणताच आजार नव्हता. रुटिन चेकअपसाठी ती रुग्णालयात गेली होती आणि तिला हार्टअॅटॅक आला. लेकीच्या निधनाने तिच्या आईला चांगलाच धक्का बसला आहे. तर गेल्या सहा महिन्यांपासून तिची दिवसरात्र काळजी घेणारा तिच्या नवऱ्याचं दु:ख शब्दातही मांडता  येणारं नाही. काल रात्री मी रुग्णालयात गेलो तेव्हा त्यांन कसा धीर देऊ मला समजत नव्हतं. चांगल्या लोकांशी देव असा कसा वागू शकतो? रेंजुषाच्या मृत्यूनंतर सावरत असतानाच हा अजून एक धक्का दिला. जेव्हा एक ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा शब्दही कमी पडतात. प्रियाचे आईवडील आणि पती यातून कसे सावरणार आहेत...त्यांना बळ मिळावं.'

डॉ प्रिया मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने किशोर सत्यासोबत करुथमुथू शोमध्ये स्क्रीन शेअर केली होती. लग्नानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता.

टॅग्स :मृत्यूगर्भवती महिलाटिव्ही कलाकार