Join us

'फुलाला सुगंध माती'चा मालिकेतून प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका, कारण वाचून भरेल तुम्हाला धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:42 IST

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेआधी ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत झळकला होता. याशिवाय 'जिगरबाज', 'भेटी लागी जीवा' या मालिकांमध्येही काम केले आहे. मालिकाच नाहीतर सिनेमातही तो झळकला आहे .

छोट्या पडद्यावर सध्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील रंजक वळणांमुळे रसिकांची आवडती मालिका बनली आहे. मालिकेती उत्तम कथानक आणि दमदार अभिनय यामुळे रसिकही खिळून आहे. मालिकेतील कलाकारही घराघरात प्रसिद्ध झाले आहे. मालिकेतल्या कलाकारांनी अभिनयामुळेच रसिकांची पसंती मिळवत मनोरंजन केले. सगळ्याच व्यक्तिरेखा तशा रसिकांच्या आवडत्याच आहेत.  मात्र मालिकेतील एका कलाकाराने मालिका सोडल्याचे समोर आले आहे.

 

आवडता कलाकार मालिके दिसणार नसल्यामुळे रसिकांमध्येही नाराज उमटणार. मात्र तो अभिनेता या मालिकेत दिसणार नसला तरी तो नवीन मालिकेत नव्या भूमिकेत झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे श्रेयस राजे. 

श्रेयस राजे फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये राजकुमार याची भूमिका  साकारत होता. निगेटीव्ह शेडमध्ये त्याची भूमिका होता. त्याची भूमिका निगेटिव्ह असली तरी चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरत होती.

 

श्रेयसने ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेआधी ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत झळकला होता. याशिवाय 'जिगरबाज', 'भेटी लागी जीवा' या मालिकांमध्येही काम केले आहे. मालिकाच नाहीतर सिनेमातही तो झळकला आहे  'बाबांची शाळा' या सिनेमात  त्याने भूमिका साकारली होती.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेनंतर श्रेयस आता 'ती परत आलीय' मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे सध्या प्रोमोही टीव्हीवर झळकत आहेत.'ती परत आलीये' असं विजय कदम आधीच्या प्रोमो मध्ये म्हणतात आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. ती कोण आहे याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती

कोण आहे हे मला माहिती पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल." विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. आता १६ ऑगस्ट रोजीच ती आणि तिची कहाणी प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.