Join us  

तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर सुयश टिळकला म्हणतेय, Missing You …Love

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 2:56 PM

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि का रे दुरावा या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुयश टिळक यांची लव्ह स्टोरी बहरत असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर आणि का रे दुरावा या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता सुयश टिळक यांच्या लव्ह स्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकताच अक्षयाने इन्स्टाग्रामवर सुयशसोबतचा एक फोटो शेअर करून ओळींमध्ये असे काही लिहिले की, ज्यामुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत अंजलीबाईची भूमिका साकारणाऱ्या अक्षयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अंजली मालिकेत नेहमीच राणादाला समजून घेते. त्यामुळे एक चांगली प्रेयसी, पत्नी अशी तिची ओळख बनली आहे. आता ही अजंली खऱ्या आयुष्यातही कोणाची तरी प्रेयसी आहे.  अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांच्या प्रेमकथेविषयी लोकांना नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कळले आहे. अक्षयाने इन्स्टाग्रामवर सुशयसोबतचा एक फोटो शेअर करताना त्याखाली, ‘मिसिंग यू...लव्ह’ असे लिहिले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचे आता उघड झाले आहे. शिवाय सोशल मीडियावर हे दोघे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. सुयश टिळक हा झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेत जय ही भूमिका साकारत होता. सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे दोघेही पुण्याचे असून, या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अक्षयाचा सुयश टिळकच खऱ्या आयुष्यातील राणा तर नाही ना, अशा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावतो आहे.दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्र आज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने भोळा भाबडा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले आहे.