भव्या गांधीची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 16:19 IST
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधून अनेक विषयांवर भाष्य केले जाते. टीव्हीवर दीर्घ काळ चालणारी मालिका म्हणूनही ...
भव्या गांधीची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून एक्झिट
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधून अनेक विषयांवर भाष्य केले जाते. टीव्हीवर दीर्घ काळ चालणारी मालिका म्हणूनही आगेकुच करीत आहे. या मालिकेतील पात्र ही याचा अविभाज्य घटक असल्याचे मानले जाते. मात्र आता या मालिके तून एक अभिनेता एक्झिट करणार असल्याचे समजते. टप्पूची भूमिका साकारणारा भव्या गांधी लकवरच या मालिकेतून बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मागील आठ वर्षांपासून भव्या गांधी या मालिकेचा भाग आहे. भव्या लहान असल्यापासून प्रेक्षक त्याला पाहत आले आहेत. त्याचा खोडकरपणा चाहत्यांना आवडत होता. त्याने टप्पू ही भूमिका चांगल्या पद्धतीने साकारत होता. मालिका सुरू झाल्याच्या एका वर्षातच टप्पूच्या भूमिकेतील भव्या घराघरात ओळखला जाऊ लागला होता. शिवाय मालिकेच्या सेटवरील तो आवडीचा अभिनेताही ठरला होता. मालिकेमधून लहानपणीचा खोडकर टप्पू एक जबाबदार युवकांत रुपांतरित झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्याच्या वयासोबत या भूमिकेचे रूप देखील बदलण्यात आले आहे. टप्पू ही भूमिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील महत्त्वाचा आधारस्तंभ मानण्यात येत होती. मात्र, आता भव्या गांधीने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना निराशा होणार आहे. भव्या या मालिकेतून बाहेर जाणार असल्याची बातमीला त्याने दुजोरा दिला आहे. भव्या म्हणाला, माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडण्याच निर्णय घेतला आहे. यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने त्यास नकार दिला आहे. अशा करूया लवकरच भव्या आपल्याला नव्या अवतारात पहायला मिळेल.