Join us

अवधुत झालाय एक्सायटेड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 06:24 IST

            एखाद्या बड्या कलाकारासाठी आपण गाणे गावे असे प्रत्येक गायकालाच वाटत असते. आणि जर ...

            एखाद्या बड्या कलाकारासाठी आपण गाणे गावे असे प्रत्येक गायकालाच वाटत असते. आणि जर का तो गायक एखाद्या अभिनेत्याचा चाहता असेल आणि त्याला त्या अभिनेत्यासाठी गायची संधी मिळत असेल मग तर सोने पे सुहागाच म्हणावे लागेल. असेच काहीसे घडत आहे अवधुत गुप्ते याच्या सोबत. आता शाहरुख खानचा कोण चाहता नाही. शाहरुखच्या चित्रपटात आपल्याला एखादे गाणे गायला मिळावे यासाठी धडपडणारे अनेक सिंगर आहेत. परंतू आपल्या मराठमोळ््या गायकाची अवधुतची तर लॉटरीच लागली असे म्हणायला खरच काही हरकत नाही. अवधुत शाहरुखच्या आगामी फॅन या चित्रपटामध्ये जबरा फॅन हे गाणे गात आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. एवढ्या मोठ्या बिग प्रोजेक्टमध्ये शाहरुखसाठी पार्श्वगायनाची संधी मिळाल्याने अवधुत भलताच एक्सायटेड झाला आहे. तो म्हणतोय, सुपर एक्सायटेड  टू बी अ पार्ट इफ सच अ बिग प्रोजेक्ट.