Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार एक आगळीवेगळी प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 14:26 IST

चंद्रकांता ही मालिका नव्वदीच्या दशकात गाजली होती. ही मालिका आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत असून ही देखील मालिका ...

चंद्रकांता ही मालिका नव्वदीच्या दशकात गाजली होती. ही मालिका आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत असून ही देखील मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. एका अद्भूत प्रेमाची मोहमयी गाथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.चंद्रकांता ही प्रेमगाथा आहे, एका जादूई जगातील सर्वांत अव्वल अय्यारा चंद्रकांता आणि तिला मारायला आलेल्या दुश्मन राष्ट्राच्या राजकुमार वीरा यांची.चंद्रकांता अशा राजकुमारीची कथा आहे, जी आपल्या स्वतःच्या ओळखीपासूनच अनोळखी आहे. तिला ठाऊक नाही की, तिच्याजवळ आहे एक अद्भूत शक्ती आणि एक तीलसमी खंजर, जो बनवू शकतो तिला शक्तिशाली.परंतु छल कपटी दुष्ट राणी इरावती या जादुई जगावर राज्य करू इच्छिते. इरावती आपला मुलगा राजकुमार वीरसह चंद्रकांताला मारण्याचे षडयंत्र रचते. तीलसमी खंजर हासील करण्यासाठी आणि चंद्रकांताला मारण्यासाठी वीर निघतो विजयगडला. तिथे गेल्यानंतर त्याची भेट होते, एका अत्यंत सुंदर मुलीशी. तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडतो. ती मुलगी दुसरी कोणी नसून चंद्रकांताच आहे. एका बाजूला वीर, जो ज्या मुलीला मारायला आला होता, तिच्याच प्रेमात पडला आहे आणि दुसरीकडे आहे चंद्रकांता, जिला हे सुद्धा माहीत नाही की, तिच्या ओळखीमुळेच वीर तिला मारायला आला आहे. काय होईल, जेव्हा चंद्रकांता आणि वीर यांचे सत्य एकमेकांसमोर येईल. कशी असेल त्यांची अद्भूत प्रेमाची मायावी गाथा हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होणार असून यात मधुरिमा तुली, विशाल आदित्य सिंग, उर्वषी ढोलकिया आणि शिल्पा सकलानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Must read : उर्वशी ढोलकियाचा चंद्रकांता मालिकेद्वारे कमबॅक