Join us

Exclusive : ​गणपती बाप्पा घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 17:18 IST

गणपती बाप्पा मोरया ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील गणपती बाप्पा, पार्वती, शंकर ...

गणपती बाप्पा मोरया ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील गणपती बाप्पा, पार्वती, शंकर देव यांच्या भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.गणपती बाप्पा मोरया ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेची चांगलीच चर्चा होती. या मालिकेचे शीर्षकगीत देखील चांगलेच हिट झाले होते. त्याचसोबत या मालिकेचा सेट देखील लोकांच्या चर्चेचा विषय बनले होते. या मालिकेचा सेट प्रचंड भव्य असून यातील शिवालय, पार्वती, गणेश कक्ष, सिंहासन, शिवलिंग अत्यंत सुंदर बनविण्यात आले होते. या मालिकेचा सेट साकारताना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करण्यात आला होता. या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच या मालिकेत आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आला होता. या मालिकेत गणपती बाप्पाची सोंड हलताना प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कोणत्याही मराठी मालिकेत पहिल्यांदाच अशाप्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. तसेच या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. गणपती बाप्पा मोरया या मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून शेवटच्या भागात गणपती बाप्पाच्या अवताराची समाप्ती होणार असून गणपती बाप्पा भूतलावर परत येणार आहे. गणपती बाप्पा या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजनने केली होती. या मालिकेआधी जय मल्हार ही त्यांची पौराणिक मालिका देखील खूपच गाजली होती. या मालिकेच्या निर्मितीत आदिनाथ कोठारेने वैयक्तिक लक्ष दिले होते.